परवानगी नाही.. कार्यक्रम नाही!! नृत्यांगना गौतमी पाटीलकडून नियमांचे उल्लंघन; गुन्हा दाखल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हि कायम वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मध्यंतरी नृत्य सादर करताना अश्लील चाळे केल्यामुळे गौतमीवर आक्षेप आणि टीकांचा मारा झाला. यानंतर माफीनामा आणि बरंच काही होऊन गेलं. यानंतर आता गौतमी पाटीलवर अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे, गौतमीसह अन्य चार जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजत आहे.

गणेशोत्सवानिमित्त अहमदनगरमध्ये वाहतूक रस्त्यावर गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात न आल्याने नृत्यांगना गौतमी पाटील, तिचा मॅनेजर आणि मंडळाच्या पदधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसं पाहिलं तर गौतमी पाटील आणि राडे यांचे काही वेगळेच कनेक्शन आहे. गेल्या जून महिन्यापासून गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद पडले होते. मात्र दहीहंडीनंतर पुन्हा गौतमीच्या कार्यक्रमांनी जोर धरला.

गणेशोत्सवानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम योजिला होता. मात्र कार्यक्रम रद्द होण्यासोबतच परवानगी न घेतल्यामुळे गौतमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील काही ठिकाणी गौतमी पाटीलवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाय गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला काही ना काही गोंधळ होत असतो. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत आहे.