‘बचपन की यादें…’; बॉलिवूडच्या तारा सिंगने दिल्या मराठमोळ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ला शुभेच्छा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये एका चित्रपटाविषयी चर्चा आहे. तो चित्रपट म्हणजे ‘आत्मपॅम्फ्लेट’. मुळात या चित्रपटाचे नाव इतके वेगळे आहे कि त्याचीच प्रचंड चर्चा आहे. शिवाय टिझर आणि ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. त्यामुळे परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटासाठी प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही उत्सुक आहेत आणि यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहेत.

उत्तम कलाकृतीला दाद देण्यामध्ये बॉलिवूडचे कलाकारही कायम पुढे असतात. बॉलिवूडचा तारा सिंग अर्थात प्रसिद्ध अभिनेता सनी देओलने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवरून आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने मराठमोळ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. या इन्स्टा स्टेटसमध्ये त्यांने बालपणीच्या आठवणींना उजाळा देत लिहीलंय, ‘बचपन की यादें हमेशा ही मन को लुभाती हैं!!! और ऐसी ही यादों से जुडा ‘आत्मपॅम्फ्लेट’ लेकर आ रहा है आशिष’.

सनीच्या पोस्टवरून समजतंय कि, ‘आत्मपॅम्फ्लेट’ची बॉलिवूडलाही भुरळ पडली आहे. गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय, कनुप्रिया ए. अय्यर मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत.