Kriti Sanon बनणार रोबो तर Shahid Kapoor होणार शास्त्रज्ञ, नव्या चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित


Shahid Kapoor, Kriti Sanon upcoming movie release date : शाहिद कपूर आणि क्रिती सेनोन यांचा लव्हस्टोरीवर आधारित एक भन्नाट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा एक पोस्टर फोटोही समोर आला असून त्यात क्रिती अन शाहिद दोघे एका टुव्हीलरवर अतिशय रोमँटिक अंदाजात (Romantic Movie) बसलेले दिसत आहेत. रोबोट लव्हस्टोरीवरील (Love Story) हा मुव्ही कधी रिलीज होणार याबाबत प्रेक्षांना उत्सुकता लागून राहली होती. मात्र आता याबाबत अतिशय आनंदाची बातमी आली असून चित्रपटाची रिलीज डेट निर्मात्यांनी जाहीर केली आहे.

यापूर्वी शाहिद कपूर अन क्रिती सिनॉन यांचा नवीन चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता 14 फेब्रुवारी 2024 हा व्हेलेंटाईन डे (Valentine Day) चा दिवस यासाठी फायनल करण्यात आला आहे. व्हेलेंटाईन डे विक मुळे फेब्रुवारी महिन्यात चित्रपटाला तरुणाईची चांगली पसंती मिळेल असा विचार करून हा दिवस रिलीज साठी ठरवण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटाची स्टोरी काय आहे?

शाहिद कपूर अन क्रिती सेनोन यांच्या लव्हस्टोरीवरील चित्रपटाची तरुण वर्गाला उत्सुकता आहे. आगामी स्टोरी हि रोबो लव्ह स्टोरी असल्याचे समजत आहे. यामध्ये शाहिद कपूर एका शाश्त्रज्ञानाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनोन एका रोबोटचे पात्र साकारणार आहे. शाहिद त्याने स्वतः बनवलेल्या रोबोच्या प्रेमात पडल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. Impossible Love Story असं या चित्रपटाला नवा देण्यात येण्याची शक्यता आहे.