‘वाटोळे करा मराठी संस्कृतीचे..’; बिकिनी लूकमुळे पुन्हा ट्रोल झाली मिताली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मिताली मयेकर ही कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय मिताली सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॉलोवर्स मोठ्या संख्येत आहेत. छोट्या पडद्यावर तर मितालीचं भारीचं क्रेझ आहे. सध्या मिताली इंडोनेशियामधील बाली येथे मस्त सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. यावेळी तिने स्वतःचे काही फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. ज्यामध्ये मितालीने बिकिनी परिधान केली आहे. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलीच ट्रोल केली आहे.

मितालीने बाली ट्रिपचे अनेक फोटो तिने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. बालीच्या समुद्रकिनारी मिताली मस्त एन्जॉय करताना बिकिनी परिधान करून तिने कमालीचे फोटोशूट केले आहे. बिकिनीतील तिचा बोल्ड अवतार पाहून तिचे चाहते आणि नेटकरी मात्र प्रचंड भडकले आहेत. ‘सनसेट सरफिंग’ असं कॅप्शन देऊन मितालीने हे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर मराठी संस्कृतीचे धडे देत मितालीला सुनावले आहे.

अभिनेत्री मिताली मयेकरचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून नेटकरी भडकले आहेत. कमेंट बॉक्स मध्ये नेटकऱ्यांनी ट्रोलिंगचा सूर ओढला आहे. ‘तुला हे शोभत नाही..’, ‘हि आपली मराठी संस्कृती नाही..’, ‘वाटोळे करा मराठी संस्कृतीचे..’, ‘तिकडेच रहा परत यायची गरज नाही..’ अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मिताली या लूकवर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मितालीच्या काही चाहत्यांना मात्र तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे. अनेक जण तिच्या बोल्ड आणि बिनधास्त असण्याचे कौतुक करत आहेत.