‘हॉस्पिटलमधील संडास साफ करा…’; नांदेडमधील ‘त्या’ घटनेचा निषेध करत केतकी स्पष्टच बोलली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केतकी चितळे ही अत्यंत बेधडक आणि स्पष्ट बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. केतकीच्या विधानांची कायम चर्चा होत असते. आताही तिने नांदेडमधील एका घटनेचा निषेध केला आहे. शासकीय रुग्णालयात रुग्ण व नवजात बालके दगावल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या घटनेचा केतकीने निषेध नोंदवताना एक पोस्ट शेअर केली आहे.

नांदेड येथे घडलेल्या घटनेचा निषेध करताना केतकी चितळेने लिहिले कि, ‘आता एका हॉस्पिटल डीनला, हॉस्पिटलमधील संडास साफ करा हे ही त्याची जात बघून सांगायचे तर!!! आणि तरीही राव आपल्याकडे खोट्या अट्रोसिटी केसेस टाकल्या जात नाहीत. जय हो Atrocities Act, 1989. आम्ही सामान्य माणसांवर काय, तर आता कुठल्या पदालाही नाही सोडणार’.

त्याच झालं असं कि, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले. या घटनेवरून राजकारण पेटलं असून आता विरोधकांकडूनदेखील राज्य सरकारवर टीका केल्या जात आहेत. दरम्यान शिंदे गटाचे खा. हेमंत पाटील यांनी काल या रुग्णालयाला भेट दिली आणि शासकीय रुग्णालयाच्या डीनला टॉयलेट साफ करायला लावले. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर हेमंत पाटील यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.