हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Tula Shikvin Changlach Dhada) झी मराठीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि टीआरपी मध्येही स्वतःची जागा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहेत. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे ही अक्षरा या भूमिकेत दिसते आहे. तर अभिनेता हृषिकेश शेलार हा अधिपती या भूमिकेत दिसतो आहे. नुकताच मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. यानंतर अधिपतीच्या एका कृतीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला आहे.
या मालिकेतील लग्नाचा ट्विस्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच झी मराठी वाहिनीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अक्षरा-अधिपतीचं लग्न झाल्यानंतर नवरीची पाठवणी सुरू असल्याचे दिसत आहे. ज्यात अक्षरा आणि तिचे कुटुंबीय भावूक झाले आहेत. (Tula Shikvin Changlach Dhada) त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून अधिपती सुद्धा भावूक होतो. यावेळी अधिपती अक्षराच्या वडिलांची समजूत काढताना म्हणतो, ‘तुमच्या मुलीचं लग्न झालं असलं तरीही आता तुमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील झाला आहे. जावई कमी आणि मुलगा जास्त’.
अधिपतीच्या अशा बोलण्याने अक्षराच्या आई वडिलांनादेखील दिलासा मिळतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. याशिवाय गृह्प्रवेशावेळी अधिपतीने घेतलेला उखाणा देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. (Tula Shikvin Changlach Dhada)’आईसाहेबांसारखी आई.. अख्ख्या पृथ्वीतलावर न्हाई.. मास्तरीन बाईंचं नाव घेतो त्यांचा तर नादचं न्हाई!!’, असा उखाणा अधिपतीने घेतला आहे. या उखाण्यातून त्याने आई आणि बायको दोघींनाही पूर्ण मान दिला आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.