Sindhutai Sapkal -‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’; चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sindhutai Sapkal) कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई– चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी पाहिली. आता मात्र चिंधीने सिंधू बनण्याचा विलक्षण प्रवास सुरु होणार आहे.

सिंधूच्या जीवनातील अनेक आव्हाने, कठीण प्रसंग, हलाखीची परिस्तिथी आणि यामधून मार्ग काढत त्यांनी सिंधू बनण्याचा प्रवास कसा पार केला हे सगळं आत्मा हेलावून ठेवणारं आणि मन सुन्न करुन जाणार आहे. त्यांचा हा खडतर प्रवास आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे सारं बघणं प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं आणि प्रेरणा देणारं ठरणार आहे. (Sindhutai Sapkal) ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेच्या उत्तम कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. आणि याच उद्दिष्टाला पुढे नेत आणखी भावनिक दृष्ट्या कथानक सादर करण्याचा प्रयत्न मालिकेचा असणार आहे.

‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेचा हा नवा अध्याय येत्या १५ ऑक्टोबर २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. करुणा आणि आशेने भरलेल्या सिंधूताईंच्या उल्लेखनीय कथेची ही मोहक निरंतरता अनुभवण्यासाठी प्रेक्षकदेखील आतुर झाले आहेत. (Sindhutai Sapkal) ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सोनार आता माईंची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेत तिला पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत.