‘ज्ञानेश्वर माऊली’मधील पांडुरंग साकारतोय आता ‘बानूचा मल्हारी’; नव्या गाण्याचे पोस्टर व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात अनेक कलाकार दररोज नवनवीन कलाकृती सादर करत असतात. या कलाकृतींमधून ते विविध प्रकारचे जॉनर प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतात. यामध्ये नाटक, चित्रपट आणि गाण्यांचा समावेश आहे. असच एक नादखुळा प्रेमाची गोष्ट सांगणार अतिशय गोड गाणं घेऊन आर जे फिल्म्स प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘बानूचा मल्हारी’ असे या गाण्याचे शीर्षक आहे. या शिर्षकावरूनच हे गाणे खंडोबा आणि बानूच्या प्रेमावर आधारलेले आहे हे समजते.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Snehal 🦋 (@snehalb_15_official)

काही दिवसांपूर्वी ‘बानूचा मल्हारी’ या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये खंडोबाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अक्षय पाटील आणि बानूच्या भूमिकेत अभिनेत्री स्नेहल भोंग दिसत आहेत. याशिवाय प्राची सुर्यवंशी आणि बाल कलाकार इशिता बारवाड या देखील गाण्यामध्ये दिसत आहेत. गाण्यात खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय पाटील हा सोनी मराठीवर लोकप्रिय ठरलेल्या ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेत पांडुरंगाची भूमिका साकारताना दिसला आहे. हे गाणे अतिशय बारकाईने आणि सुंदर पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन राहुल जाधव यांनी केले आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by akshay patil (@akshay_patil_24)

गाण्याच्या चित्रीकरणाची जबाबदारी ऋषिकेश आणि निलेश यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. जी त्यांनी व्यवस्थित पार पडली आहे. याशिवाय रंगभूषा अमर राठोड आणि फरीन शेख यांनी केली आहे. तर संकलन रोहित हब्बू यांनी केले आहे. तसेच प्रो. मॅनेजर म्हणून राहुल समींदर यांनी आपली कामगिरी अगदी चोख पद्धतीने पार पाडली आहे. ‘बानूचा मल्हारी’ या गाण्याचे कार्यकारी निर्माते सुधीर अयाचित आणि संभाजी बारबोले आहेत. या गाण्याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना दिग्दर्शक राहुल जाधव यांनी म्हटले कि, ‘रसिक प्रेक्षकांनी याआधी जसे माझ्या प्रत्येक गाण्यावर प्रेम केले आहे, अगदी तसेच माझ्या याही गाण्याला त्यांनी प्रचंड प्रतिसाद द्यावा आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात आमची कलाकृती पोहोचवावी’.