‘प्रिय आई….’; सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलिया देशमुखची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या जादुई अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश यांच्या जोडीकडे पाहिलं जातं. जिनिलीयाने मराठी, हिंदी आणि अगदी साऊथमध्ये काम केले आहे. रितेशसोबत प्रेम विवाह केल्यानंतर जिनिलिया देशमुख घराण्याची सून झाली. तिने देशमुख घराला आणि देशमुखांनी जिनिलियाला आपलंस केलं. आज जिनिलियाने तिच्या सासूबाईंची खास पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिझूझा यांनी २०१२ साली लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला ११ वर्ष झाली असून जिनिलियाने देशमुख घराण्याची सून होऊन घराला सांभाळलं. अमराठी असल्यामुळे देशमुख घराण्यानेदेखील तिला मोलाची साथ दिली. जिनिलीयाने लग्नानंतर घर आणि मुलांच्या संगोपनावर लक्ष दिलं. यामध्ये जिनिलियाला तिच्या सासूबाईंची मोलाची साथ मिळाली. आज जिनिलीयाच्या सासूबाई आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सुनबाईंनी खास पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये जिनिलियाने तिच्या सासूबाईंचे आभार मानले आहेत. सोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘प्रिय आई, एक आधुनिक विचारांची स्त्री कशी असते, हे मला शिकवल्याबद्दल धन्यवाद. माझ्यावर स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम केले यासाठीही तुमचे आभार. माझी मराठी थोडी थोडी सुधारल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी आई झाल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. तुमच्यासारखं दुसरं कुणी असूच शकत नाही’.

याशिवाय रितेशने संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, ‘आई, लव्ह यू!! तू आमचे जीवन आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!’ सध्या दोघांच्याही पोस्ट व्हायरल होत आहेत.