सुयश टिळक साकारतोय आव्हानात्मक भूमिका; फर्स्ट लूक शेअर करत दिलं चाहत्यांना सरप्राईज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुयश टिळक याने आजवर नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे सुयशच्या अभिनयावर फिदा असणाऱ्या प्रेक्षकांचा एक वेगळा वर्ग आहे. सुयश टिळक हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सुयशने साकारलेल्या भूमिका या कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात आणि अशातच आता आणखी एका वेगळ्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतो आहे. त्याच्या नव्या भूमिकेचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

अभिनेता सुयश टिळकचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या नव्या भूमिकेची वाट पाहत होते. अखेर आता सुयश एका नव्या आणि आधीपेक्षा फार वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या नव्या भूमिकेची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे सुयशने याच माध्यमातून आपल्या चाहत्यांना नव्या भूमिकेची ओळख करून दिली आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर सुयशने ही पोस्ट शेअर केली आहे.

या व्हिडीओत सुयश एक लूक परिधान करताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत कॅप्शन देताना त्याने लिहिलंय, ‘नवीन आव्हानात्नक भूमिका’. माहितीनुसार, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेत सुयश ही नवी भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेचे कथानक सध्या अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आहे.

अनेक दिवसांपासून मालिकेत सचित राजेच्या नावाची चर्चा रंगल्याचे आपण पहिले. दरम्यान अंकुश हाच सचित राजे असल्याचे भासवले जात असताना खरा सचित मात्र दुसराच आहे हे समोर येणार आहे. त्यामुळे मालिकेत आता खऱ्या सचित राजेची म्हणून अभिनेता सुयश टिळकच्या भूमिकेची एंट्री होणार आहे.