तुम्हाला माहितेय..? टीव्ही अभिनेत्री अदितीचं क्रिकेटर राहुल द्रविडशी आहे खास नातं; जाणून घ्या


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अदिती द्रविड ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजतागायत तिने अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच ती कलर्स मराठीच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनी हे पात्र साकारताना दिसली होती. शिवाय अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणे अदिती द्रविडने लिहिले आहे. तेव्हापासून अदितीचा चाहता वर्ग आणखीच वाढलाय. दरम्यान अदिती आणि क्रिकेटर राहुल द्रविड यांचे एक खास नाते आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे हे नातं.

अभिनेत्री अदिती द्रविड हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे ती कायम वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. शिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बाबी आणि आगामी प्रोजेक्ट्सविषयी ती आवर्जून लिहिते. नुकताच तिने सोशल मीडियावर क्रिकेटर राहुल द्रविड यांच्यासोबतच फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अदिती आणि राहुल द्रविड यांच्या या ग्रेट भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अभिनेत्रीच्या कॅप्शनमुळे एकच चर्चा रंगली.

अदिती द्रविडने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती क्रिकेटर राहुल द्रविड यांच्या बाजूला उभी राहून पोज देताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘द्रविडियन्स’. हा फोटो तिने राहुल द्रविड यांना टॅग केला आहे. यानंतर ओसशल मीडियावर अदिती आणि राहुल द्रविड यांचे काय नाते आहे..? यावरून चर्चा रंगली आहे. तर अदिती आणि राहुल द्रविड हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. होय. इतकेच नव्हे तर राहुल द्रविड हे अदितीचे काका आहेत. यानुसार त्यांच्यामध्ये काका पुतणीचे नाते आहे.