‘सेx दरम्यान स्त्रियांना काय हवंय…’; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सामाजिक, आर्थिक, राजकीय वा अन्य कोणत्याही विषयावर बेधडक वक्तव्य करण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने. डिजिटल युगात सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर करत किरण माने आपल्या भावना व्यक्त आणि विचार मांडताना दिसतात. आपल्याला जे वाटत ते निर्भीड बोलण्यासाठी ते या माध्यमाचा वापर करतात. चार दिवसापूर्वी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा ‘थँक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटासाठी एक पोस्ट शेअर केली होती. यातून त्यांनी चित्रपटाच्या मूळ विषयाचे कौतुक केले आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘…मागच्या आठवड्यात एका सिनेमाचं कौतुक करताना एका जाणकार समीक्षकानं ल्हीलंवतं, ‘क्लायमॅक्स फसलाय, पण सिनेमा छान आहे !’…वाचून म्हन्लं, च्यायला हे कसं शक्यंय..? ‘क्लायमॅक्स’ फसनारी कुठलीबी गोष्ट चांगली कशी असू शकते??? उत्तम क्लायमॅक्ससाठी तर आयुष्यात सगळा झगडा सुरू असतो आपला…असो. …तर अशा एका अति महत्त्वाच्या ‘क्लायमॅक्स’ बद्दल बिनधास्त बोलनारा भन्नाट पिच्चर परवा बघितला… ‘थॅंक यू फाॅर कमिंग’! सेक्समध्ये स्त्रियांना हव्या असणार्‍या ‘ऑरगॅजम’बद्दल मनोरंजनातनं काहीतरी सांगू पहाणारा असा भारतीय ‘मेन स्ट्रीम’ सिनेमा आजपर्यन्त मी तरी पाहिला नव्हता’.

‘…पाचसहा वर्षांपूर्वी कंडोम बनवणाऱ्या एका कंपनीनं रिसर्चनुसार सांगीतलंवतं की, आपल्याकडं सत्तर टक्के महिलांना सेक्स दरम्यान ऑरगॅजम मिळतच नाही…आणि नव्वद टक्के पुरूष सेक्सदरम्यान स्त्रियांना काय हवंय याचा विचारच करत नाहीत!! खरंतर याच आपल्या भारत देशानं हजारो वर्षांपूर्वी वात्स्यायन नांवाचा खराखुरा फेमिनिस्ट विचारवंत दिला. ज्यानं ‘कामसूत्र’ ग्रंथात लिहीलंय की ‘सेक्समध्ये स्त्रियांच्या लैंगिक सुखालाही समान महत्त्व आहे. उत्तम सेक्स तोच असतो ज्यात स्त्री आणि पुरुष दोघेही एकत्र तृप्तीच्या चरमसीमेपर्यंत अर्थात क्लायमॅक्सपर्यन्त पोहोचतात. या विषयी ‘जाणीव’ झालेल्या आजच्या काळातल्या एका तरूणीची गमतीशीर कथा ‘थॅंक यू फाॅर कमिंग’मध्ये सांगीतलीय. ‘ऑरगॅजम’पर्यन्त पोचवणारा पुरूषच नवरा म्हणून पायजे ही तिची इच्छा’.

‘सेक्सकडे केवळ दोन चार मिनिटांचा खेळ म्हणून बघणार्‍या पुरुषांच्या जगात तिचा हा प्रवास खूप अनपेक्षित धक्के देत, वळणं घेत, अतिशय इन्टेन्स अशा शेवटाकडे… तिला हव्या असलेल्या क्लायमॅक्सकडे आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणार्‍या ‘चरमसीमे’कडे घेऊन जातो! सिनेमात काही लाॅजिकल चुका आहेत. उथळ वाटेल असा फेमिनिजम आहे. पण एक मात्र खरं की, स्त्रियांविषयी जी गोष्ट उघडपणे बोलली जात नाही, चार भिंतीतही विषय नसतो. तिला ग्लॅमरस कमर्शियल सेक्स काॅमेडी सिनेमाच्या माध्यमातनं का होईना वाचा फोडली गेली. असा सिनेमा लिहिल्याबद्दल राधिका आनंद – प्रशस्ती सिंग या लेखिकांच्या जोडीला सलाम केला पायजे. पुरूषांसाठी स्त्रिचा ‘जी पाॅईंट’ शोधणं जितकं कठीण, तितकंच स्त्रिसाठी त्या गोष्टीचं महत्त्व एक्सप्लेन करणं अवघड… ते काम या दोघींनी अतिशय सहजपणे केलंय. एका हटके विषयाची छान रोलर कोस्टर राईड हवी असेल तर नक्की बघा…’थॅंक यू फाॅर कमिंग’!’