हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडिया हे असे माध्यम आहे ज्याच्या साहाय्याने अनेक लोक एकमेकांशी अगदी सहज जोडली गेली आहेत. सेलिब्रिटी मंडळी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहतात. अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी, अनुभव, किस्से आणि प्रोजेक्ट्सची माहिती ते याच माध्यामातून चाहत्यांना देत असतात. गेल्या काही दिवसांत बरेच सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसले आहेत. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.
मुग्धा वैंश्यपायन- प्रथमेश लघाटे, सई ताम्हणकर – अनिश जोग, प्रथमेश परब – क्षितिजा घोसाळकर यांच्यापाठोपाठ आता आणखी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आरती मोरेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आणि तिचा बॉयफ्रेंड दिसतो आहे. आयुष्यातील खास व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त तिने हि पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री आरती मोरेने अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर हि पोस्ट शेअर करताना त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिने प्रेमाची कबुली दिली आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘ ”असणं” हा शब्द मानवी रुपात आला तर त्याला तू तुझ्याशिवाय दुसरा पर्याय ठेवणार आहेस का…?? कसं जमत तुला..? कसं..? Thank You वगैरे खूप formal नको बोलायला आता मी! आय लव्ह यू जानेमन, वाढदिवसाच्या शुभेच्छा!!’ माहितीनुसार, आरती आणि अक्षय पाटील गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघेही अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. अक्षय दशमी क्रिएशन्सच्या निर्मिती संस्थेसाठी काम करतो. आरती आणि अक्षय कॉलेजपासून एकमेकांसोबत आहेत.