ए हालोssss!! नवरात्रीनिमित्त क्रांती रेडकरच्या जुळ्या लेकींनी घेतला गरबा नृत्याचा आनंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही अभिनय विश्वापेक्षा जास्त सध्या सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करून क्रांती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. अनेकदा ती स्वतःसोबत तिच्या जुळ्या मुलींचे क्युट व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिच्या लेकींचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. नुकताच क्रांतीने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गोदो आणि छबील गरबा खेळताना दिसत आहेत.

कर्णाती रेडकर सोशल मीडियावर तिच्या लेकींचे व्हिडीओ कायम शेअर करते. ज्यामध्ये गोदो आणि छबीलचा क्युटनेस नेहमीच नेटकऱ्यांना प्रेमात पाडतो. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. नवरात्र म्हटलं कि गरबा, दांडिया आलाच आणि मोठ्यांच्या कृतीचे लहानांना किती आकर्षण असते हे काही वेगळे सांगायला नको. क्रांतीच्या जुळ्या मुलींच्या गोड करामती नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आजही त्यांचा एक व्हिडीओ असाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये गोदो आणि छबील गरबा नृत्य करताना दिसत आहेत.

क्रांतीने तिच्या लेकींचा हा गोड व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याआधी क्रांती रेडकरच्या जुळ्या लेकी अनेकदा गाणी गाताना दिसल्या आहेत. पण आता या दोघी चक्क गरबा नृत्य करताना दिसत आहेत. क्रांतीने हा व्हिडीओ इंस्टाग्राम हँडलच्या स्टोरीवर शेअर केला आहे.

यामध्ये गोदो आणि छबील या चिमुकल्या परींनी पंजाबी ड्रेस परिधान केले आहेत. व्हिडिओत दोघीही आपापल्या परीने छान असा गरबा नृत्य करताना दिसत आहेत. क्रांतीने हा व्हिडीओ शेअर करताण गरबा टाईम याचा जीआयएफ शेअर केला आहे.