अक्षयने रेखाटलं बाप्पाचं सुंदर चित्र; Video शेअर करत म्हणाला, ‘पोटात खूsssssप मोठा गोळा आलाय’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन चारचा विजेता अभिनेता अक्षय केळकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. उत्तम अभिनयासह अक्षयने ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारीदेखील उत्तमरीत्या पार पाडली. शिवाय तो सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये अक्षय गणपती बाप्पाचे सुंदर चित्र रेखाटत असल्याचे दिसत आहे. हे चित्र काढण्यामागचे कारण सांगत त्याने हि पोस्ट शेअर केली आहे.

अक्षय केळकरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘आयुष्यात बाप्पाने मला खूप काही दिलं… सुरुवातीला, लहानपणी, चित्र म्हंटलं की मी कायम बाप्पाचं चित्र काढायचो…. after lockdown मी पुन्हा चित्रं काढायला सुरवात केली…माझ्या सगळ्या आवडत्या देवांची मी चित्र काढली आणि बाकीही बऱ्याच concept ची सतत चित्र काढली होतीच… पण जो मला लहानपणापासून सगळं काही देत आला, मोठं झाल्यावर मी त्याचं चित्र काढलंच नाही… आणि आज हे पूर्ण केलंय! आणि पोटात खूsssssप मोठा गोळा आलाय… बाप्पाच्या पोटा पेक्षाही खूप मोठा… कारण… माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट घडणारे… आणि ती ही त्यानेच दिलीय…’

‘आता हे चित्र आयुष्यभर अशा ठिकाणी राहणारे जिकडे मी आतापर्यंत बरंच काही पाहिलंय… पण आता मात्र मी तिथे नसेन… बाप्पा मी तिथून जाणार आहे आणि तू तिथे असशील… ते माझं होतं… कदाचित या साठी माझ्या हातून इतकी वर्ष तुला घडायचं नव्हतं का रे ??? तू मला आता जे काही दिलंयस ना ते खूप आहे…. काळजी घे तुझी … आणि आता तू जिथे असणार आहेस तिथल्या लोकांची आणि माझीही आणि माझ्या लोकांचीही… तुझा अक्षय’. अक्षयच्या या पोस्टवर नेटकरी, चाहते आणि अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत त्याच्या कलेचे कौतुक केले आहे.