RSS’च्या दसरा मेळाव्याला प्राजक्ता माळीची हजेरी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली,


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हि मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. इतकेच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी, अनुभव, किस्सेदेखील ती शेअर करत असते. दरम्यान दसऱ्याच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही एक व्हिडीओ पोस्ट आहे आणि यामध्ये प्राजक्ता RSS च्या दसरा मेळाव्यात हजर राहिल्याचे समजत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आला आहे. प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आज आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा – विजयादशमी उत्सव अनुभवता आला. तेही केंद्रीय मंत्री – नितीनजी गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत. समस्त संघ परिवाराचे यासाठी मनापासून आभार’.

या कॅप्शनसोबत RSS, विजयादशमी, संघपरिवार, शिस्त, राष्ट्रप्रेम, भारत, प्रेरणादायी, सरसंघचालकडॉमोहनभागवतजी असे हॅशटॅग देखील तिने आहेत. नागपूर येथे विजयादशमीनिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ने ‘विजयादशमी उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित होती. तसेच या कार्यक्रम प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी असे मान्यवरदेखील उपस्थित होते.