‘आई कुठे काय करते’मधील संजना सोडणार मालिका..?; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ही नेहमीच विविध ट्विस्टमूळे चर्चेत असते. या मालिकेत विविध भूमिका साकारणारे कलाकार हे प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले ही ‘संजना’ हे नकारात्मक पात्र साकारताना दिसते आहे. भूमिका निगेटिव्ह असली तरीही रुपाली ज्या पद्धतीने ती साकारते आहे ते वाखडण्याजोगे आहे. रुपालीने साकारलेली संजना प्रेक्षकांची अत्यंत लाडकी नकारात्मक भूमिका आहे. पण सध्या रुपाली संजनाचा निरोप घेणार आहे असे बोलले जात आहे.

त्याच झालं असं कि, रुपालीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘एक ग्रेट BHET सुरेश वाडकरजी आणि पद्मा वाडकरजी.. तुमचे आशीर्वाद घेउन पुढच्या प्रवासाला निघाले आणि मला खात्री अहे हा प्रवास खूप सुखकर होणार, आम्ही आजही एन्जॉय करत असलेली इतकी अप्रतिम गाणी दिल्याबद्दल धन्यवाद.. तुम्हा दोघांना भेटून आनंद झाला’. कॅप्शनमधील नवा प्रवास… हे वाचून आता रुपाली ‘आई कुठे काय करते’ मालिका सोडणार कि काय..? अशी चर्चा आहे.

सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सुरु असलेल्या ट्रॅकमुळे संजनामध्ये झालेले बदल हे प्रेक्षकांना प्रचंड भावले आहेत. आता संजना देशमुखांची सून आणि एक चांगली व्यक्ती म्हणून वावरताना दिसते आहे. ज्यामुळे प्रेक्षकांसाठी संजनाची इमेज आता चांगली होऊ लागली आहे. याआधी अरुंधतीला त्रास देणे, सतत कट कारस्थान करणे आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याचे घर तोडणारी संजना अशी नकारात्मक इमेज असल्यामुळे कुठे ना कुठे रुपालीला देखील प्रेक्षकांचा रोष पत्करावा लागला होता. पण आताची संजना प्रेक्षकांना आवडतेय. असे असताना रुपालीने हि भूमिका सोडू नये असे प्रत्येकाला वाटत आहे. पण यात किती तथ्य आहे हे तर स्वतः रुपालीच सांगू शकते.