Jhimma 2 Cast – आनंदाच्या ट्रीपमध्ये नव्या मेंबर्सची एंट्री; ‘झिम्मा 2’ चित्रपटाचे पोस्टर व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2 Cast) बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २४ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र चित्रपट गृहात दाखल होणार आहे. पण तत्पूर्वी चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘झिम्मा २’चा प्री टिझर अलीकडेच रिलीज झाला. ज्यामध्ये सिद्धार्थ चांदेकर आगामी ट्रिपचे नियोजन करताना दिसला. या ट्रिपसाठी इंदू डार्लिंगच्या बड्डेचे कारण ठळक करण्यात आले. यानंतर आता नव्या पोस्टरमध्ये २ नवे चेहरे झळकले आहेत.

जिओ स्टुडिओजच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे नवं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सायली संजीव, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत, सुहास जोशी, शिवानी सुर्वे आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दिसत आहे. (Jhimma 2 Cast) या पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘तिच मज्जा आहे दुसऱ्याही डावात… आईच्या नाही… आज्जीच्याही गावात! तुमचे आमचे REUNION बरोबर एक महिन्यात… २४ नोव्हेंबर पासून चित्रपटगृहात! झिम्माच्या मॅड फॅमिलीत तुमचं स्वागत आहे रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे..’

Jhimma 2 Cast

पोस्टरमध्ये आणि ‘झिम्मा’च्या फॅमिलीत आता अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे यांची एंट्री झाली आहे. तर मृण्मयी देशपांडे आणि सोनाली कुलकर्णी मात्र या पोस्टरमध्ये नसल्यामुळे रिंकू आणि शिवानी यांनी त्यांना रिप्लेस केले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. (Jhimma 2 Cast) पोस्टरमध्ये रिंकूच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत असल्यामुळे ती विवाहित स्त्रीचे पात्र साकारत आहे हे स्पष्ट आहे. मात्र रिंकू आणि शिवानी या ट्रिपचा भाग कशा झाल्या..? हे पाहणे रंजक ठरणार आहे. आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता स्पष्ट दिसत आहे.