‘आयुष्यभर स्मरणात राहील…’; प्राजक्ता माळीने शेअर केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीचा अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री प्राजक्ताने माळी यंदाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात दिसली. विशेष उपस्थिती म्हणून प्राजक्ता माळीला या सोहळ्यात आमंत्रित केले गेले होते. दरम्यान, राजकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्तींसोबत तिच्या गाठीभेटी झाल्या. नवरात्र उत्सवानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने नागपूरमध्ये एका कार्यक्रमाच्या आयोजकांशी समन्वय साधून देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ही पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘मी आणि केंद्रिय मंत्री नितीनजी नागपूरात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिला. आयोजकांना म्हटलं, सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल आणि नितीनजींनी तात्काळ वेळ दिला. नवमीला नितीनजींच्या निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यामुळे सबंध परिवारालाही भेटता आलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’…अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या’.

‘ ‘’श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो’’ हे ऐकून मला विशेष आनंद झाला.. निघताना त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं, त्यांच्या कामावर लिहिली गेलेली ८- ९ पुस्तकं दिली. नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिली. (जी मी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसली.) आयुष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार’. प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.