Sai Lokur – ‘सुंदर साडी, फुलांचे दागिने अन चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज’; दणक्यात पार पडलं सई लोकुरचं डोहाळे जेवण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sai Lokur) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस‘च्या सीजन एकमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सई लोकूर ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. लवकरच सई तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. आईपणाच्या प्रत्येक पायरीचा ती मनापासून आनंद घेताना दिसते आहे. दरम्यान सई सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे आपल्या गरोदरपणातील लहान मोठ्या गोष्टी आणि अनुभव ती आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करते आहे. नुकताच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sai Lokur

अभिनेत्री सई लोकुरने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. सईने ती गरोदर असल्याची बातमीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शेअर केली होती. (Sai Lokur) दरम्यान नुकताच सईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Sai Lokur

या कार्यक्रमातील काही गोड फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या खास कार्यक्रमासाठी सईने पोपटी रंगाची जांभळा काठ असलेली साडी नेसली होती. यावर तिने जांभळ्या रंगाच्या फुलांनी तयार केलेले सुंदर दागिने परिधान केलेले. सई या लूकमध्ये फार देखणी दिसत होती.

यावेळी सईने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या डोहाळे जेवणाचा एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सईसोबत तिचा पती तीर्थदीप रॉय आणि कुटुंबातील इतर काही व्यक्ती दिसत आहेत. (Sai Lokur) तसेच सई आणि तीर्थदीप यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे.

दोघेही आपल्या बाळाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. माहितीनुसार, सई लोकूर कर्नाटकमधील बेळगाव येथे बाळाचे स्वागत करणार आहे. सईने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओवर नेटकरी कमेंट करत बाळाच्या आगमनाची उत्सुकता व्यक्त करत आहेत.