रेश्मा शिंदेने घेतला ‘वदनी कवळ’च्या शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद; तृप्त होऊन म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये देखील कार्यरत आहेत. यांमध्ये अलीकडे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलच्या समावेश झाला आहे. नुकतंच तिने पुण्यात तिच्या भावासोबत ‘वदनी कवळ’ नावाचं नवं हॉटेल सुरु केलं आहे. या हॉटेलमध्ये खवैय्यांना पारंपरिक आणि शुद्ध शाहाकारी भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. नुकतच तिच्या हॉटेलमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदेने हजेरी लावली होती.

‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने पुण्यातील डेक्कन परिसरात ‘वदनी कवळ’ नावाचं नवीन हॉटेल सुरू केलं आहे. नुकतंच १९ ऑक्टोबर २०२३ रोजी हे हॉटेल सुरु केलं आहे. अनघा अतुल ही पंडित अतुलशास्त्री भगरे यांची मुलगी असून तिने आणि तिच्या भावाने या नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. दरम्यान नुकतीच ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या रेश्मा शिंदेने अनघाच्या नव्या हॉटेलला भेट दिली. यावेळी तिने हॉटेलमधील पदार्थांचा आस्वाद घेण्याआधी ‘वदनी कवळ’ श्लोक म्हटला. तिने एक व्हिडीओ शेअर करत जेवणाच्या चवीविषयी सांगितलं आहे.

या पोस्टसोबत रेश्माने, ‘आपल्या बिझी शेड्युलमध्ये आपल सतत बाहेरच खाण होत.. मग तुम्हाला कधी अस वाटतं? आत्ता छान घरचं जेवण हवंय.. वाटतं ना? मग पुणेकरांचा हा प्रश्न सुटलाय.. अगदी घराच्या जेवणाची आठवण करु देणारं ‘वदनी कवळ ‘ हे रेसटॉरंट पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे.. सुग्रस आणी सात्विक भोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर वदनी कवळला नक्की भेट द्या! मी या भोजनाचा आस्वाद घेतलाय तुम्ही सुध्दा ध्या.. तुम्ही निराश होणार नाही याची खात्री आहे…अनघा आणि अखिलेश नवीन व्यवसायासह आपण आपली स्वतःची एक नवीन ओळख तयार करणार आहात. मला तुमचा अभिमान आहे. तुमचे हे नवीन कार्य तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचवणार एक धाडसी पाऊल आहे, याबद्दल तुमचे कौतुक! अनघा माझी सोबत आणि प्रेम कायमच तुझ्यासोबत आहे. || गणपती बाप्पा मोरया || PS : मला पूर्ण वदनी कवळ येतं…एखादा शब्द चुकू नये म्हणून हा प्रयत्न!’