हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल अनेक सेलिब्रिटी विविध कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेताना दिसतात. यामध्ये अगदी डान्स इव्हेन्ट, शॉप ओपनिंग, लग्न, वाढदिवस आणि अजून बरेच खास प्रसंग सेलिब्रिटी मंडळींसाठी उत्पन्नाचे अन्य एक माध्यम ठरले आहेत. दरम्यान गेली अनेक वर्ष मराठी सिनेविश्वात फोटोग्राफर म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्नील रास्ते यांनी सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यामातून एक पोस्ट शेअर करत कलाकारांच्या अवास्तव मागण्यांमूळे होणार त्रास व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर स्वप्नील रास्ते यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘(कार्यक्रम पत्रिका छापून आल्यावर) मी सेलिब्रिटी आहे यार, माझ्या ह्या ह्या अटी आहेत, तरच मी येईन, नाहीतर कॅन्सल करू. बरं! मी ही क्लाएंट आहे तुझा. माझ्या अटींचं काय..? बरं, ह्या अटी आधी का नाही नमूद केल्या..? कलाकार मित्रांनो, प्रत्येकाचा काळ हा मर्यादितच असतो. रहा की जमिनीवर आणि करा की काम. अमर्यादित काळ मनात घर करून राहाल, एक माणूस म्हणून सुध्दा!’
स्वप्नील रस्ते यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आपली सहमती दर्शवली आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी आपले मत प्रकट केले आहे. यातील अनेकांनी कलाकारांच्या अवाजवी मागण्यांबाबत संताप व्यक्त केला आहे. यापैकी एकाने तर असेही म्हटले कि, ‘उद्या हीच लोक भीक मागत येतील तुमच्याकडे सर सोडून द्या त्यांना अहंकारी लोक आहेत, मी अनेक लोकांना स्टेज दिली. सगळी व्यवस्था स्वखर्चाने केली. त्यावेळी लोक मला साधी ओळख देत न्हवते. आज 1 हजारांची गरज आहे म्हणून फोन करतात, अशी हाल होईल त्यांचे काळजी करू नका, सोडून द्या’. उरावर स्वप्नील यांनी मात्र ‘अशी वेळ कोणावर येऊ नये असे म्हटले आहे