‘जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा…’; ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री आईच्या आठवणीत भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील ९० दशकात एकापेक्षा एक सरस कलाकृती देणाऱ्या प्राजक्ता कुलकर्णी दिघे आजही एक लोकप्रिय चेहरा आहेत. त्यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘धडाकेबाज’ चित्रपटात साकारलेली गंगी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सध्या त्या स्टार प्रवाहावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अर्जुनची आई म्हणजे कल्पना ही भूमिका साकारत आहेत. दरम्यान प्राजक्ता यांनी आपल्या आईच्या आठवणीत लिहिलेली एक खास भावनिक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर करत भावनिक कॅप्शन लिहीलं आहे. ज्यात त्यांनी म्हटलंय, ‘आई, तू आम्हाला सोडून जाऊन पाच वर्षं झाली… आजचा दिवस आठवणं मला नकोसं वाटतं… आई, तू खुल्या मनाने तुझं प्रेम आम्हाला दिलंस… पण मी तुला नेहमीच गृहीत धरलं… तू माझ्यावर खूपदा ओरडली असशील, पण तू कधीच माझ्यावर रागावली नाहीस, तू माझ्यावर फक्त प्रेम करत राहिलीस… मला नेहमी प्रश्न पडतो की, तू इतकी मोठ्या मनाची आणि निर्मळ मनाची कशी काय असू शकतेस?… पण खरंतर तुला माहित आहे, जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा त्याची खरी जाणीव होते’.

‘दुर्दैवाने तू इतकी पुढे निघून गेली आहेस की, मी तुझी माफीही मागू शकत नाही….ते म्हणतात ना देव सगळीकडे पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. पण देवा, तू तिलाही आमच्यापासून दूर घेऊन गेलास…आई मला खात्री आहे की तू जिथे असशील तिथे तुझ्यावर प्रेम होईल….आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि जमलं तर मला माफ कर…. तुझी खूप आठवण येते,” असं प्राजक्ता यांनी लिहीलं आहे. प्राजक्ता यांच्या या पोस्टवर अनेक नेटकरी आणि कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.