नाद करायचा नाय!! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चाखली कोल्हापूरची लोकप्रिय मिसळ; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातदेखील आपली खतरनाक खेळी दाखवून त्यांनी प्रेक्षकांना मोहित केले. शिवाय सुरेखा कुडची सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून त्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आताही त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टची चर्चा सुरु आहे.

अभिनेत्री सुरेखा कुडची या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात आणि त्यांच्या संपर्कात राहताना दिसतात. नुकतीच त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्या कोल्हापुरच्या ज्योतिबाचं दर्शन घेताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन देताना लिहिलं आहे कि, ‘गेले काही दिवस कोकणात म्हणजे कुडाळला शूट ला गेले होते. तिथून पुण्याला येताना कोल्हापूरला जायचा योग आला.. आणि मग काय … म्हटलं चला ज्योतिबाच दर्शन घतल्याशिवाय पुणे गाठायच नाही… खूप छान दर्शन झालं… ज्योतिबाच्या नावानं चांगभलं भल ….’.

मुख्य म्हणजे यावेळी सुरेखा कुडची यांनी ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर मस्त चमचमीत मिसळवर ताव मारला. कोल्हापूरच्या फडतरे मिसळ सेंटरला भेट देऊन सुरेखा यांनी तेथील काही फोटो पोस्ट केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘कुडाळला शूटिंग संपवून कोल्हापूरला आले ते थेट फडतरे मिसळ खायला… कोल्हापूरची ही मिसळ म्हणजे नाद करायचा नाय… 20 min वेटींगला थांबले पण शेवटी मिसळ खाऊनच बाहेर पडले…’. सुरेखा कुडची यांचे हे दोन्हीही व्हिडीओ व्हायरल होत आहेत आणि या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करत आहेत.