गिरीश परदेशी यांच्या बॉलिवूड स्टाईल नाटकाला कलाकारांच्या शुभेच्छा; कधी आहे शुभारंभ प्रयोग..? जाणून घ्या


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी साहित्यिक द. मा. मिरासदार लिखित ‘व्यंकूची शिकवणी’ या विनोदी कथेवर आधारित आणि गिरीश परदेशी दिग्दर्शित ‘गुरु दक्षिणा’ या नाटकाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. क्रिशिव क्रिएशन्स या नाट्य संस्थेतर्फे ‘गुरु दक्षिणा’ हे हिंदी नाटक प्रायोगिक रंगभूमीवर येऊ घातले आहे.

अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि धमाल सादरीकरणाच्या माध्यमातून हे नाटक साकारण्यात आले आहे. गिरीश परदेशी यांनी बॉलीवूड शैलीमध्ये हे नाटक दिग्दर्शित केले असल्यामुळे हि आगळी वेगळी कलाकृती पाहण्यासाठी केवळ प्रेक्षक नव्हे तर अनेक कलाकार मंडळी देखील उत्सुक आहेत.

अभिनेते गिरीश परदेशी दिग्दर्शित ‘गुरु दक्षिणा’ या नाटकाचा शुभारंभ प्रयोग येत्या ४ नोव्हेंबर २०२३ रोजी शनिवारी पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रायोगिक रंगभूमीवर हे नाटक वेगळ्या शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. या नाटकाला शुभेच्छा देताना अभिनेते मिलिंद शिंदे म्हणाले कि, ‘ख्यातनाम साहित्यिक कथाकार द. मा. मिरासदार यांची कथा आहे ‘व्यंकूची शिकवणी’. त्याचे नाट्य रूपांतर आमचे मित्र गिरीश परदेशी यांनी केले आहे. या वेगळ्या प्रयोगात बॉलिवूड फॅन्सी विनोद, मनोरंजन, मसाला सगळं आहे. हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्हीही जरूर नाटकाला या!’

याशिवाय ‘देवमाणूस’ मालिका फेम अभिनेता किरण गायकवाडने नाटकाला शुभेच्छा देताना म्हटले कि, ‘क्रिशिव क्रिएशन्स सादर करत आहे एक धमाल विनोदी सिनेमा शैलीतील नाटक ”गुरुदक्षिणा”. द. मा. मिरासदार यांचे हे लिखाण आहे. त्यांनी ‘व्यंकूची शिकवणी’ हे कमाल लेखन केले होते. त्याच हिंदी रूपांतर केलं आहे. गिरीश परदेशी यांनी हे नाटक लिहिलं आणि बसवलं आहे. तर येत्या ४ नोव्हेंबर रोजी हे नाटक पाहायला विसरू नका’, असे म्हणत किरणने प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी आवाहन केले आहे.

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने यांनीदेखील गिरीश परदेशी आणि त्यांचे नाटक ‘गुरुदक्षिणा’ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुकन्या मोने म्हणाल्या, ‘आपला मित्र गिरीश परदेशी याने एक प्रायोगिक नाटक दिग्दर्शित केले आहे आणि हे नाटक बेतलेलं आहे द. मा. मिरासदार यांच्या ”व्यंक्यूची शिकवणी” या कथेवर. आता द. मा. मिरासदार हे किती व्यंगात्मक आणि विनोदी शैलीचे लेखक होते हे मी काही नव्याने सांगायला नको.

https://www.instagram.com/reel/CyxlTcUogug/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

पण गिरीशने मात्र हे नाटक जरा बॉलिवूड पद्धतीने, मसालेदार पद्धतीने बसवलेलं आहे. याचा पहिला प्रयोग ४ नोव्हेंबर रोजी भरत नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर य दिवशी शनिवार आहे आणि तुमचा हा शनिवार मस्त जाणार याची मला खात्री आहे बुआ.. आणि तुम्हीही चांगला प्रतिसाद द्याल याचीही मला खात्री आहे.