राजा माणूस!! विशाल निकमच्या ‘त्या’ कृतीने जिंकलं नेटकऱ्यांचं मन; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला अभिनेता विशाल निकम आजही सर्वांच्या लक्षात आहे. बिग बॉसमधून घराघरांत लोकप्रिय झालेला विशाल त्याच्या स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनात वसला. प्रत्येकाचा आदर करणे, खेळाडू वृत्ती आणि जिगरबाज म्हणून विशालने ओळख मिळवली. शिवाय ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई- मायेचं कवच’ या मालिकांमध्येही तो झळकला. सध्या विशाल ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग दरम्यान कोल्हापुरात असताना तो ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेला. इथला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विशाल निकम आणि कोल्हापूरची माती यांचे घट्ट नाते आहे. त्यामुळे ज्योतिबाच्या मंदिरात विशाल आलेला पाहताच त्याच्या चाहत्यांची गर्दी जमली. प्रत्येकाला त्याच्यासोबत फोटो काढायचा होता, गप्पा मारायच्या होत्या. हा व्हिडीओ स्वतः विशालने शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘जो भी चाहूं वो मैं पाऊं ज़िंदगी में जीत जाऊं…देवाच्या कृपेने मला जे हवंय ते मला मिळालं आहे…असंच प्रेम आणि तुमची साथ कायम माझ्यासोबत राहूद्या’. दरम्यान मंदिर परिसरात विशालबरोबर फोटो काढण्यासाठी जमा झालेल्या गर्दीत एका काकांनी त्याच्याकडे सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली.

या काकांकडे सेल्फी कॅमेरा असलेला फोन नव्हता. मग त्यांनी त्यांच्याजवळ असलेला जुना, लहान बटणाचा फोन विशालच्या हातात दिला. पण यावेळी विशालने कोणताही इकडचा तिकडचा विचार न करता थेट त्या बटणाच्या फोनमध्ये मागच्या कॅमेऱ्याने काकांबरोबर सेल्फी काढला. विशालची ही कृती पाहून तिचे उपस्थित असलेले सगळेच भारावले. हा व्हिडीओ व्हायरल होताच प्रत्येकाने विशालच्या कृतीचे कौतुक केले आहे. ‘गरिबीची जाण असलेला..’, ‘हे कोल्हापूर आहे इथं पैशापेक्षा माणसांना खूप महत्व दिल जात’, ‘विशाल म्हणजे राजा माणूस’ अशा कमेंट्स या व्हिडिओवर येताना दिसत आहेत.