Dunki Movie Teaser Released : वाढदिवशी शाहरुख खानचे चाहत्यांना भन्नाट रिटर्न गिफ्ट, ‘डंकी’ चित्रपटाचा पहिला टिझर रिलीझ


Dunki Movie Teaser Released | आज म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी अभिनेता शाहरुख खान त्याचा 58 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शाहरुखच्या चाहत्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यावर्षी पठाण आणि जवान सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर शाहरुखचे चाहते या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र, या चित्रपटासाठी लोकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिराणी या सोशल कॉमेडी ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

डंकी हा चित्रपट 22 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल हे देखील दिसणार आहेत. डंकी हा सामाजिक समस्या आणि समाजातील वाईट गोष्टी आणि श्रद्धा यांना आव्हान देणारा चित्रपट आहे. यामध्ये, डंकी हा एक कोड शब्द आहे जो ‘डंकी फ्लाइट’ या शब्दापासून बनला आहे. ‘डंकी फ्लाईट’ हा दोन देशांमधील सीमा ओलांडण्याचा बेकायदेशीर मार्ग आहे, म्हणजे लोक कायदेशीर मार्गाने इच्छित देशांमध्ये गेल्यास जर तुम्हाला देशात प्रवेश मिळू शकत नसेल, तर त्या देशात बेकायदेशीरपणे पोहोचण्याच्या मार्गाला डंकी उड्डाण म्हणतात. चित्रपटाचा ट्रेलर पाहता यात कॉमेडी, इमोशन्स आणि रोमान्स पाहायला मिळणार असल्याचे दिसते.

या वर्षी शाहरुख खानचे जवान आणि पठाण हे दोन्ही चित्रपट भारतातील टॉप-3 सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये समाविष्ट आहेत. जवान हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वाधिक आगाऊ बुकिंगचा विक्रमही केला आहे. SRK चा पठाण हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे.

हेही वाचा- Mi Nathuram Godse Boltoy : शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत असणारे नाटक सातासमुद्रापार इतिहास रचायला सज्ज

पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई करणारा हा वर्षातील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत २०० कोटी आणि तीन दिवसांत ३०० कोटींचा व्यवसाय केला. अशा परिस्थितीत डंकी चित्रपटाकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. जर डंकी देखील हिट झाला, तर 2023 मध्ये 3 मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा शाहरुख खान एकमेव स्टार असेल.