एकदम वाईट!!! ‘साधी माफीदेखील मागितलेली नाही..’; ‘या’ कारणामुळे नामांकित विमान कंपनीवर भडकला जितू


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला जितेंद्र जोशी सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. दर्जेदार अभिनय, दमदार लेखक, उत्कृष्ट संवादफेक आणि हृदयस्पर्शी काव्यलेखनातून जितेंद्र कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. त्यामुळे जितेंद्रच्या आयुष्यातील घडामोडींवर प्रेक्षकांचे बारीक लक्ष असते. शिवाय तो स्वतःच सोशल मीडियावर अनेकदा व्यक्त होताना दिसतो. आताही त्याने एक पोस्ट शेअर करत संतापजनक अनुभव शेअर केला आहे.

अभिनेता जितेंद्र जोशीने त्याला नुकताच विमानप्रवास करताना आलेला संतापजनक अनुभव आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. याबद्दल त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. जितेंद्र जोशीने या स्टोरीमध्ये फोटो शेअर करत नामांकित विमान कंपनी इंडिगोबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या नामांकित विमान कंपनीचा उल्लेख करताना जितेंद्र जोशीने लिहिले आहे कि, ‘एकदम वाईट!!! तुम्ही प्रतिष्ठा अन् आदर सगळंच गमावलं. तुमची विमानं तब्बल दीड तास उशिराने उड्डाण करत आहेत. याबद्दल तुम्ही प्रवाशांची साधी माफीदेखील मागितलेली नाही’.

Aniket Vishwasrao

अभिनेता जितेंद्र जोशीने हि पोस्ट शेअर करत आपल्याला आलेल्या अनुभवाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रसिद्ध विमान कंपनीला त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. याआधी देखील अनेक कलाकार मंडळींनी असाच सोशल मीडिया हॅण्डलचा वापर करून काही नामवंत विमान कंपनीच्या सर्व्हिसबाबत संताप व्यक्त केला आहे. अलीकडेच अभिनेता अनिकेत विश्वासरावने देखील नामवंत विमान कंपनीच्या नावांचा उल्लेख करत आपल्याला आलेला अनुभव शेअर केला होता.