हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कुशल बद्रिके हा अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेता आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून कुशलने प्रेक्षकांना अगदी पोट धरून हसवलं आहे. या कार्यक्रमात त्याने साकारलेले प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. शिवाय मालिका, चित्रपटातून देखील कुशलने कायम विनोदी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कुशलने आपल्या विनोदी शैलीच्या माध्यमातून अभिनय विश्वात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर कुशलच्या लेखणीतही जोर आहे.
कुशल सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि या माध्यमातून तो वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतो. आताही कुशलने शेअर केलेल्या काही पोस्ट चांगल्याच व्हायरल होत आहेत. यातील एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये कुशलने लिहिलं आहे कि, ‘कुणीतरी येऊन आपल्या आयुष्यात रंग भरेल, ही कल्पनाच मुळात झुठ आहे. कारण ज्याचं त्याला स्वतंत्र आभाळ असतं. आणि आपल्या आभाळाचे आपणच इंद्रधनुष्य असतो. (सुकुन)’. याशिवाय आणखी एक पोस्ट कुशलने शेअर केली आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘मेरा कोई गाँव नहीं, मेरा कोई शहेर नहीं. मैं कहीं ठहेरू, ऐसा कोई पहेर नहीं, सफ़र का हूँभी तो मेरा कोई सफ़र नहीं. मैं कोई नहीं , मानो जैसे मैं हूँ ही नहीं. (सुकून)’
कुशल अशा अनेक पोस्ट शेअर करून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. त्याने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट आणि त्यासोबत लिहिलेलं कॅप्शन हे कायम चर्चेचा विषय ठरतं. गेल्या अनेक दिवसांपासून तो ‘सुकुन’ या नावाने लिहीत असलेले कॅप्शन आणि त्यातील भावना कुशलला त्याच्या चाहत्यांसोबत थेट जोडतात. त्यामुळे कुशलच्या पोस्ट या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही त्याने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत कुशलच्या लेखणीचे कौतुक करत आहेत.