Parinirvana – ’40 दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर पण…’; ‘परिनिर्वाण’चे शूटिंग संपताच प्रसाद ओकची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Parinirvana) मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसाद ओककडे पाहिले जाते. केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर गेल्या काही वर्षात प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रातही आपली कमाल दाखवली आहे. आपल्या अव्वल अभिनयाच्या जोरावर त्याने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अगदी नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘धर्मवीर‘ या चित्रपटातील त्याने साकारलेले आनंद दिघे तर प्रेक्षकांच्या डोळ्यात वसले. यानंतर आता ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटातून प्रसाद आणखी एका दिग्गज व्यक्तिमत्वाच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

(Parinirvana) नुकतीच अभिनेता प्रसाद ओकने एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाबद्दलची एक मोठी अपडेट दिली आहे. प्रसादने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पाठमोरा दिसतोय. यासोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘ “महापरिनिर्वाण” आज अखेरीस ४० दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर असा पण प्रचंड समाधान देणारा शूटिंगचा प्रवास संपला..!! माझ्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार..!! माझे सहकलाकार अंजली पाटील, गौरव मोरे, कुणाल मेश्राम, कमलेश सावंत, हेमल इंगळे… तुमचं सेट वरचं सोबत असणं खूप मोलाचं आणि भार हलका करणारं होतं…!!!’

(Parinirvana)

‘फुलवा… तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम केलं मी पण खूप मज्जा आली…!!! नितीश नांदगावकर… फार सुंदर सेट्स आणि चंद्रकांत सोनावणे सर… एखादी बाई दागिना कसा मिरवते तसे तुमचे कपडे घालून मिरवावसं वाटलं…!!! वा…!!! वा…!!! माझी मेक अप टीम सलीम, प्रताप, आणि सुन्या तुम्हाला खूप प्रेम…!!!’दिग्दर्शक शैलेंद्र बागडे सर छायाचित्रकार अमर कांबळे आणि निर्माते आशिष सर आणि सुनील सर… तुमच्या कष्टांचं कौतुक करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे… (Parinirvana) इतकं perfect काम करणारे निर्माते, छायाचित्रकार आणि लेखक दिग्दर्शक एकत्रपणे फार कमी वेळ अनुभवायला मिळतात…!!! हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय झाला, त्याचं श्रेय संपूर्ण टीम ला…!!!’.

हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन ६ डिसेंबर १९५६ या दिवसावर आधारलेला आहे. या चित्रपटात प्रसाद साकारत असलेल्या भूमिकेचे नाव ‘नामदेव व्हटकर’ आहे. नामदेव व्हटकर यांनी आंबेडकरांच्या निर्वाण यात्रेतील काही छायाचित्र टिपली होती. महामानवाच्या निर्वाण यात्रेला अजरामर करण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. (Parinirvana)