हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरांत पोहोचल्या. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे सुप्रिया पाठारे यांच्याविषयी कायम चर्चा सुरु असते. सुप्रिया पाठारे यांच्यासह त्यांचा मुलगा मिहीर पाठारेदेखील काही दिवसांपासून चर्चेत आहे.
काही महिन्यांपूर्वी मिहीरने ‘महाराज’ नावाचे हॉटेल सुरु केले. ज्याच्या उदघाटनाची तुफान चर्चा रंगली. इथली स्पेशल पावभाजी खायला खवय्ये लांबून येताना दिसले. दरम्यान हे हॉटेल बंद झाल्याची चर्चा उठली आहे. याविषयी स्वतः सुप्रिया पाठारे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली.
सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर हा प्रोफेशनने शेफ आहे आणि त्याने काही वर्षांपूर्वी सुरु केलेला फूड ट्रक काही महिन्यांपूर्वी हॉटेल रूपात सुरु झाला. वाढती गर्दी आणि खवय्यांची दाद हि मिहिरसाठी खास बात ठरली. पण काही दिवसांपासून मीहिरचं हॉटेल सतत बंद दिसत असल्यामुळे खवैय्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली. अवघ्या काही महिन्यांतच सुप्रिया पाठारे यांच्या लेकाचं म्हणेजच मिहीरचं हॉटेल बंद झाल्याच्या चर्चा सुरू झल्या. या संदर्भात सुप्रिया यांना अनेक फोनदेखील आले. अखेर त्यांनी व्हिडिओ शेअर करत हॉटेल बंद झालं नसून एका कारणामूळे काही दिवस बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले.
या व्हिडिओत सुप्रिया पाठारे म्हणाल्या कि, ‘तुम्हाला माहितेय की, मिहिरनं काही महिन्यापूर्वीच ठाण्यात खेवरा सर्कलच्या इथं महाराज हॉटेल सुरू केलं. इथं स्पेशल पावभाजी मिळते. हे हॉटेल गेल्या १०- १५ दिवसांपासून बंद होतं. त्यामुळं हे हॉटेल बंद झाल्याचं म्हटलं जात होतं. मला आणि माझ्या मुलाला यासंदर्भात अनेकांचे फोन आले, पण असं काहीही नाहीये. २१ ऑक्टोबर रोजी माझी आई गेली. त्यामुळे आम्ही हॉटेल बंद ठेवलं होतं.
कालच आईचं कार्य झालं. बिझनेस आहे तो सुरू ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे ३ तारखेपासून पुन्हा हॉटेल सुरू होणार आहे. सगळ्यांनी नक्की या’. सुप्रिया यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शुक्रवार ३ नोव्हेंबर २०२३ पासून हे हॉटेल पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आणि आधीसारखी खवैय्यांची पुन्हा एकदा गर्दी पहायला मिळते आहे.