Vaibhav Mangle | आजकाल प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि या प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. अनेक शारीरिक व्याधींना मानवाला सामोरे जावे लागत आहे. अशा दिवाळी तोंडावर आलेली आहे. आणि दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. यावेळी मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी फटाके फोडू नका अशी कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट वरून लोकांना ही विनंती केली आहे.
सध्या पुणे मुंबई दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये प्रदूषणाची झळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा विचार करून आता न्यायालयाने रात्री फक्त तीन तासांसाठी फटाके फोडण्याची परवानगी दिलेली आहे. आता यावर वैभव मांगले यांनी फेसबुक पोस्ट करून विनंती केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, “कळकळीची विनंती मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश महानगरातील हा भाग कमालाची प्रदूषित आहे कृपया फटाके फोडून ती अधिक प्रदूषित करू नका.”
हेही वाचा – परदेशात मराठी पोरींचा कल्ला..; ‘झिम्मा 2’मधील नव्या रूपात बाईपण जपणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
वैभव मांगलेच्या या पोस्टला त्यांच्या अनेक चाहत्यांनी समर्थन केले. परंतु काही नेटकरांनी त्यांना चांगलं सुनावल आहे. त्यांनी म्हटले आहे की, “हिंदू सण समारंभ आले की, मगच सगळा आपोआप प्रदूषण वाढायला सुरुवात होतं का? होळी दहन करू नका दिवाळी फटाके करू नका हे करू नका ते करू नका म्हणणारे अनेक बंधन घालतील. खरंतर अशाच लोकांच्या घरा खाली फटाके फोडले पाहिजे.”
अशाप्रकारे वैभव मांगले यांच्या या पोस्टला काहीजण समर्थन करत आहे. तर काही जणांच्या भावना दुखावल्याने ते मोठ्या प्रमाणात त्यांना खडे बोल देखील सुनावत आहेत.