अरुंधती पोहोचली लेकीच्या शाळेत!! विद्यार्थ्यांना दिले कवितांचे धडे; अनुभव शेअर करत म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर अरुंधती हि भूमिका साकारते आहे. अरुंधतीची ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. सोशिक पण तितकीच खंबीर अशी अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती कायमच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच मधुराणी तिच्या लेकीच्या शाळेत शिकवायला गेली होती. तेव्हाच अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मधुराणी कामात कितीही व्यस्त असली तरी लेकीसाठी वेळ काढताना दिसते. असाच कामातून वेळ काढत ती मुलीच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कवितांचे धडे द्यायला गेली होती. यावेळी तिच्यासोबत विद्यार्थी देखील कवितेच्या दुनियेत रमली होती आणि हे पाहून तिला आनंद झाला. हा आनंद तिने शब्दात व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मधुराणीने ती विद्यार्थ्यांना कविता शिकवतानाचा एक व्हिडीओ या पोस्टसोबत जोडला आहे. या व्हिडिओसोबत तिने लिहिलंय, ‘स्वरालीच्या गोकुळ शाळेत काल कविता शिकवायला गेले होते. कुसुमाग्रज, गदिमा, शांता शेळके, विंदा, नलेश पाटील अशा मोठमोठ्या कवींच्या कविता अर्थ समजून घेत घेत आम्ही एकत्र म्हंटल्या मुलांचा उत्साह, प्रत्येक कवितेतून अर्थ उलगडताना त्यांचे कुतूहलाने लुकलुकणारे डोळे, ‘’अजून एक, अजून एक कविता’’ अशी त्यांची आर्जवं… हे सगळंच फार प्रेमात पडणारं होतं’.

‘ह्याच वयात मुलांना आपण कवितेची गोडी लावली, त्यातून मिळणाऱ्या निर्भेळ आनंदाची ओळख करून दिली तर आयुष्यातल्या बऱ्या वाईट प्रसंगात मनावर फुंकर घालणारी जन्मभराची एक सखीच मिळवून दिली। मुलांबरोबर कविता गायला हव्यात … त्यातला निर्मळ आनंद असा लुटत राहायला हवा. गोकुळच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पेठकर हिनी माझ्या मागे लागून माझ्याकडून हे करून घेतलं…. ह्या काव्यप्रेमीचे आभार’. मधुराणीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.