MHJ फेम अभिनेत्रीचा शरद पोंक्षेंच्या हस्ते सन्मान; मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार.. म्हणाली, ‘अशी प्रोत्साहनाची थाप..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रकाशझोतात आलेली भिवाली अवली कोहली म्हणजेच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरनेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मानत अढळ स्थान निर्माण केलेल्या प्रियदर्शनीला नुकताच ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या कामाची दखल घेत तिला हा पुरस्कार अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते देण्यात आला. यासाठी तिने आभार मानणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रियदर्शनी इंदलकरने हा सन्मान स्वीकारतानाचे फोटो आणि व्हिडीओ या पोस्टमध्ये शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मला ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळाला आणि तो देखील शरद पोंक्षे यांच्याकडून…. किती सुंदर संध्याकाळ… अशी प्रोत्साहनाची थाप पाठीवर पडल्यावर, काम करायची ऊर्जा आणखी वाढ़ते. धन्यवाद कशीश सोशल फाऊंडेशन!!! आणि तुम्ही जे काम करताय, त्यासाठी अनेक शुभेच्छा!!’. प्रियदर्शनीची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकरी, चाहते आणि कलाकार मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आरती मोरे, समीर चौघुले, ऋतुजा बागवे यांनी आवर्जून प्रियदर्शनीच्या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे. दरम्यान प्रियदर्शनी इंदलकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात झळकत आहे. तसेच तिने सुबोध भावेसोबत ‘ती फुलराणी’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या शेवंता तांडेल या भूमिकेचे देखील प्रचंड कौतुक झाले होते.