मुंबईच्या ट्रॅफिकने रिंकू राजगुरूला केलं हैराण; फोटो शेअर करत म्हणाली…


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाहतूक कोंडी हि एक जागतिक समस्या आहे. जिचे समाधान अद्याप कुणाला मिळालेले नाही. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांत तर ट्रॅफिक जॅम ही दैनंदिन बाब झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबाबत मेट्रो स्थानक आणि रस्ते दुरुस्तीची काम सुरु असल्याने आधीपेक्षा जास्त ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली आहे. ज्याचा त्रास मुंबईकर रोज सहन करत आहेत. तर रोज मुंबईला ये जा करणाऱ्या नागरिकांना देखील हाल सोसावे लागत आहेत. यामध्ये अनेक कलाकार मंडळींचा समावेश आहे. नुकतीच रिंकू राजगुरूनेदेखील या समस्येबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ज्यामुळे ती अनेकदा विविध फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देताना दिसते. या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, रिंकू राजगुरूने नुकताच मुंबईतील वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला आहे. रिंकूने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट असून यामध्ये रिंकूने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये रिंकू प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे दिसत आहे.

हा फोटो शेअर करताना रिंकूने त्याला ‘मुंबई ट्राफिक’ असे कॅप्शन दिले आहे. इतकेच नव्हे तर त्यासोबत रिंकूने कंटाळलेल्या, हैराण झालेल्या अवस्थेमधील एका इमोजीचा वापर केला आहे. केवळ रिंकू राजगुरू नव्हे तर याआधी अनेक सेलिब्रिटी मंडळींनी वाहतूक कोंडी अर्थात ट्रॅफिक जॅमबाबत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. यामध्ये हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी, सागर तळशीकर, नम्रता संभेराव अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. याच लिस्टमध्ये आता रिंकू राजगुरूचादेखील समावेश झाला आहे. दरम्यान, रिंकू राजगुरु ‘झिम्मा २’ या चित्रपटात निर्मिती सावंत यांची सुनबाई ‘तानिया’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिचा हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.