दादा गुड न्यूज आहे..? उमेश- प्रियाचा ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांनी लावले तर्क- वितर्क


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी अभिनेता उमेश कामत आणि त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहेच. शिवाय या जोडीचादेखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांना एकत्र पाहिलं कि आपसूकचं तोंडातून ‘मेड फॉर इच अदर’ असे निघते. सध्या सोशल मीडियावर उमेश आणि प्रियाचा एक फोटो व्हायरल होतोय. जो पाहून नेटकऱ्यांनी प्रिया प्रेग्नंन्ट असून त्यांच्याकडे गुडन्यूज असल्याचे तर्क लावले आहेत.

उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ आणि आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टी ते या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह शेअर करत असतात. अनेकदा हे दोघं एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतात. सध्या त्यांचा अतिशय गोड असा एक फोटो व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये उमेश आणि प्रिया फारच क्युट दिसत आहेत. या फोटोवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडतोय. पण यावरील काही कमेंट्सने मात्र लक्ष वेधून घेतले आहे.

उमेश आणि प्रियाने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये उमेशने प्रियाच्या पोटावर हात ठेवून पोज दिल्या आहेत. यावरून नेटकऱ्यांनी गजब तर्क लावले आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत विचारलं आहे कि, ‘दादा… गुड न्यूज आहे का?’ इतकेच काय तर या फोटोवर प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यानेही कमेंट करत म्हटले आहे कि, ‘येस येस येस… दादा एक गुड न्यूज आहे का..?’ आता या कमेंट्समुळे इतरही नेटकऱ्यांना उमेश प्रियाकडे गुडन्यूज असल्याची शंका येऊ लागली आहे. असे असले तरीही अद्याप या कमेंट्सवर उमेश किंवा प्रिया दोघांपैकी कुणीही प्रत्युत्तर दिलेले नाही. यामुळे गुडन्यूजच्या चर्चांनी आणखीच वेग धरला आहे.