Boys 4 | दिवाळीचा सिनेप्रेमींना खास बोनस, ‘बॉयस 4’ बघता येणार केवळ 99 रुपयात


Boys 4 | मित्रांना दिवाळीनिमित्त अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच प्रेक्षकांचा बहुचर्चित सिनेमा बॉईज 4 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे l. अनेक ठिकाणी हाउसफुल हा शो होत आहे. परंतु आता बॉईज 4 पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण हा सिनेमा तुम्हाला केवळ 99 रुपयांना पाहता येणार आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा सिनेमा पहावा यासाठी ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे.

बॉईज 4 चे निर्माते राजेंद्र शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “,मराठी प्रेक्षकांनी बॉईज, बॉईज 2 बॉईज 3 प्रमाणे बॉईज 4 या चित्रपटालाही उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पहावा त्यासाठी 99 रुपयांची ऑफर प्रेक्षकांसाठी ठेवली आहे.”

हेही वाचा – जयदीप- गौरीचा पुनर्जन्म होणार..; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक 25 वर्षांनी पुढे सरकणार

या चित्रपटात धैर्या ढुंग्या आणि कबीर गॅंगमध्ये नवीन अनेक मुलं सहभागी झाली आहेत. यामध्ये सुमंत शिंदे पार्थ, भालेराव, प्रतीक लाड हे या चित्रपटात दिसतात. त्याचप्रमाणे श्रुतिका शोत्री, अभिनय बेर्डे, निखिल बने,गौरव मोरे, ऋतुजा शिंदे यादेखील या चित्रपटात दिसणार आहे. तसेच या चित्रपटात गिरीश कुलकर्णी समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या देखील प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

बॉईज 4 बद्दल | Boys 4

या सिनेमाचे लेखन ऋषिकेश कोळी यांनी केले आहे. तसेच सखाराम देवरुखकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनकेले आहे . शाळेपासून सुरू झालेला हा बॉईज चा प्रवासाचा डिग्री कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक नवीन गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरवेळी प्रमाणे एक नवीन गोष्ट घेऊन हा चित्रपट आला आहे. सगळ्यात आधी बॉईज हा चित्रपट 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2018 मध्ये दुसरा पार्ट आला 2022 मध्ये तिसरा पार्ट आला. तर यावर्षी आलेला चौथ्या पार्टला देखील प्रेक्षकांचे खूप प्रतिसाद मिळत आहे.