‘आमच्या हॉटेलच्या चवीबद्दल …’; अनघा अतुलने केला ‘वदनी कवळ’बाबत मोठा खुलासा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कला विश्वातील अनेक कलाकार मंडळी मराठी अभिनय क्षेत्राशिवाय अन्य काही क्षेत्रांमध्ये देखील कार्यरत आहेत. यातील बहुतांश कलाकारांनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे, अभिनेता निरंजन कुलकर्णी अशा अनेक कलाकारांचा यात समावेश आहे. दरम्यान ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलनेदेखील तिच्या भावासोबत अलीकडेच पुण्यात नवं हॉटेल सुरु केलं आहे.

अभिनेत्री अनघा अतुलच्या हॉटेलचं ‘वदनी कवळ’ असे नाव आहे. गेल्या १९ ऑक्टोबर २०२३ रोजी तिने पुण्यातील डेक्कन परिसरात तिचं हॉटेल सुरु केलं आहे. पारंपरिक इंटिरियर आणि शुद्ध, सात्विक शाकाहारी जेवण हि या हॉटेलची खासियत अलीकडेच तिने एका नामवंत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीती आपल्या हॉटेलविषयी काही खुलासे केले. यावेळी ती म्हणाली कि, ‘हॉटेलमध्ये इंटिरियर करायचं ही माझी मनापासून इच्छा होती. परंतु, इंटिरियरवर खर्च करण्याची माझा भाऊ आणि बाबांची अजिबात इच्छा नव्हती. मी खूप प्रयत्न करून हे काम करून घेतलं’.

पुढे म्हणाली, ‘मी त्यांच्या मागे लागून त्यांना इंटिरियरबद्दल सांगितलं. माझ्या पद्धतीने मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि आता हे इंटिरियर सर्वांना आवडलं आहे. आमच्या हॉटेलच्या चवीबद्दल जेवढं बोललं जातं… तेवढंच इंटिरियरबद्दल बोललं जात आहे. माझ्या मैत्रिणीच्या मदतीने हे सुंदर इंटिरियर मला करता आलं’. या हॉटेलच्या एका भिंतीवर ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे…’ हा श्लोक लिहलेला दिसतोय. तर एका भिंतीजवळ पांडुरंगाची सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे. तसेच अनघाने पुणे शहराचे जुने विंटेज आणि कुटुंबीयांचे फोटो लावले आहेत. हॉटेलचा हा मराठमोळा लूक पाहून खवैय्ये आणखीच तृप्त होत आहेत.