बिग बॉस हाऊसमध्ये अंकिताला रडताना पाहून अमृता खानविलकर झाली भावुक; म्हणाली, ‘तू खूप खंबीर आहेस, पण..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस हिंदी सीजन १५’ सुरु आहे. १५ ऑक्टोबर २०२३ पासून हा कार्यक्रम सुरु झाला. यंदाच्या पर्वात ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. एरवी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसणारी ही जोडी ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमात गेल्यापासून चक्क भांडताना दिसते आहे. बिग बॉसच्या घरात एकत्र असताना अंकिता आणि विकीमध्ये रोज नवा वाद होताना दिसतो आहे.

https://www.instagram.com/reel/CzULP4Th1bq/?utm_source=ig_web_copy_link

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडप्यासोबतचं ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट ही जोडीदेखील सहभागी झाली आहे. आधी या दोन्ही जोड्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध दिसत होते. पण आता या जोडप्यांमध्ये सतत भांडण होताना दिसत आहे. दरम्यान बऱ्याचवेळा अंकिता आणि विकीमध्ये याच कारणामुळे वाद होताना दिसत आहेत. या सगळ्या भांडणाला कंटाळून, वैतागून शेवटी अंकिताला रडू कोसळले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तिची मैत्रीण अमृता खानविलकरसुद्धा भावुक झाली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये अंकिता म्हणते, ‘मला आईकडे घरी जायचंय…’. यानंतर विकी तिला जवळ घेऊन तिची समजूत काढताना दिसतोय. हा व्हिडीओ अंकिताची मैत्रीण आणि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘अंकिता… माझी बेबी… तू खूप जास्त खंबीर आहेस. पण, तुझ्या सध्याच्या परिस्थितीला मी चांगलंच समजू शकते. तुला खूप प्रेम अंकुडी’. मैत्रिणीच्या डोळ्यात पाहून अमृताही भावुक झाल्याचे तिच्या कॅप्शनवरून समजत आहे.