हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अगदी काहीच दिवसांपूर्वी एकमेकांना डेट करत असल्याची जाहीर कबुली दिली आहे. यानंतर हे नवंनवं समोर आलेलं जोडपं सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. कधी एखाद्या इव्हेंटमुळे तर कधी केळवणाच्या कार्यक्रमांमुळे हि जोडी चर्चेचा विषय ठरतेय. नुकतेच सोशल मीडियावर या जोडीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्यांनी कपल ट्विनिंग केल्याचे दिसत आहे.
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ आणि मुख्य म्हणजे एकमेकांसोबतचे अनेक क्षण ते आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. अशातच जेव्हा या दोघांनीही आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली, तेव्हा मात्र सोशल मीडियावर नुसता आनंदी आनंद पहायला मिळाला.
आता नेटकऱ्यांमध्ये मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाबद्दल मोठी चर्चा सुरु आहे. अलीकडेच प्रथमेश आणि मुग्धा यांनी केळवणाचे देखील व्हिडीओ शेअर केले होते. यानंतर आता नुकताच मुग्धाने एका कार्यक्रमादरम्यान दोघांनी केलेल्या कपल ट्विनिंगचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळतेय.
मुग्धा आणि प्रथमेशचा हा फोटो एका कार्यक्रमाच्या शूटदरम्यान क्लिक करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी ट्विनिंग के ल्याचे दिसत आहे. मुग्धा आणि प्रथमेशच्या कपड्यांवर विठ्ठल आणि रखुमाईची सुंदर प्रतिमा दिसते आहे. मुग्धाच्या ड्रेसच्या जॅकेटवर विठुराया तर प्रथमेशच्या ब्लेझरवर रखुमाईच्या प्रतिमा उठून दिसते आहे. दोघांनी एकमेकांकडे बोटं दाखवत ‘माझा विठ्ठल आणि माझी रखुमाई’ म्हणून एकमेकांना संबोधल्याचे दिसत आहे. पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या मैत्रीने आज प्रेमाचे रूप घेतले आहे. या जोडीच्या लग्नाबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.