Amruta Khanvilkar |राज ठाकरे यांनी अमृता खानविलकरला पाठवले दिवाळीचे गिफ्ट, अभिनेत्रीने मानले ठाकरे परिवाराचे आभार


Amruta Khanvilkar | सध्या सर्वत्र दिवाळीची धूमधाम पाहायला मिळत आहेत. सगळेजण दिवाळीच्या तयारीमध्ये तसेच दिवाळी साजरा करण्यामध्ये मग्न आहेत. सगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये आजकाल रोषणाई पसरलेली दिसत आहे. दिवाळीनिमित्त सगळेच जवळची माणसं येतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात आणि शुभेच्छा देखील देतात. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिला दिवाळीचे एक खास भेटवस्तू मिळाली आहे. आणि तिने त्या भेटवस्तूचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांनी दिली भेटवस्तू | Amruta Khanvilkar

अमृता ही एक चांगली अभिनेत्री आहे. परंतु त्यासोबत ती एक चांगली डान्सर देखील आहे. सोशल मीडियावर देखील ती कायमच चर्चेत असते. तिचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओतील सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने तिच्या नवीन गिफ्ट चाहत्यांना दाखवले आहे. हे गिफ्ट तिला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठवलेले आहे.

हेही वाचा- ‘रंग माझा वेगळा’मधील छोट्या कार्तिकीने बनवल्या चटकदार चकल्या; व्हिडीओ झाला व्हायरल

अमृता खानविलकरची पोस्ट

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून माहिती दिलेली आहे. ही भेट वस्तू स्वीकारताना तिने राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले आहे. तिने फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “राज साहेब, शालिनी वहिनी, मिताली आणि अमित ठाकरे तुम्हाला मनापासून धन्यवाद.”

सध्या तिने केलेली ही सोशल मीडियावर चांगली चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या तिच्या कलावती या चित्रपटामुळे चांगली चर्चेत आहे. या चित्रपटातील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याशिवाय ती ललिता बाबर या बायोपिकमध्ये देखील असणार आहे. त्याचप्रमाणे प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर यांची जोडी ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.