नेमकी पप्पी कोणाची घ्यायची..? अभिनेता शशांक केतकरची ‘ती’ पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी ह्या घरची’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेतून श्री हे पात्र साकारत अभिनेता शशांक केतकरने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय हे पात्र साकारतो आहे. मालिका, नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमातून शशांकने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान शशांकने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो कायम वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आताही त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडिओसोबत त्याने शेअर केलेलं कॅप्शन मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. शशांकने मुंबईतील मरिन ड्राइव्ह या लोकप्रिय पर्यटन स्थळाचा फोटो शेअर केला आहे. या ठिकाणी अनेक प्रेमी युगल एकमेकांमध्ये मग्न दिसतात.

याच मरिन ड्राइव्ह परिसरातील जोडप्यांचा एक व्हायरल व्हिडीओ शशांक केतकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हायरल व्हिडीओ शेअर करताना शशांकने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘नेमकी पप्पी कोणाची घ्यायची हा गोंधळ होत नसेल का यांचा…??’ यासोबत त्याने हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. शशांकची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून याआधी अनेक लोकांनी जोडप्यांच्या कृतीवर भाष्य केले आहे.