जिनिलिया वहिनी शोधतायत भाड्याने बाप; लेकासाठी हवाय ‘ट्रायल पिरियड’वर पप्पा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेविश्वात विविध भूमिकांमधून आपली हक्काची जागा निर्माण करणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख हि अवघ्या महाराष्ट्राची वहिनी आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया यांची जोडी लाखांत एक आणि सतत चर्चेत असते. ‘वेड’ चित्रपटानंतर तर अमराठी असूनही जिनिलियाने जे भाव दर्शवले आहेत त्यामुळे तिचा चाहता वर्ग चौपट वाढला आहे. अशातच जिनिलियाचा आता आणखी एक नवा हिंदी सिनेमा येऊ घातला आहे. ज्यामध्ये ती सिंगल मदरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

जिनिलिया देशमुख हि अतिशय गुणी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिला विविध भूमिकांमध्ये पहायला प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. वेड चित्रपटानंतर तर जिनिलियाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीच वाढल्या आहेत. जिनीलीया डीसुजा देशमुखने या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘वेड’मधून प्रेक्षकांना वेड लावल्यानंतर आता आणखी एका भन्नाट कथानकासह ती आपल्या भेटीस येत आहे. तिच्या या नव्या सिनेमाचा ट्रेलरदेखील प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे नाव ‘ट्रायल पिरीयड’ असे आहे. केवळ नाव नव्हे तर सिनेमाचे कथानक देखील जबरदस्त आहे. या चित्रपटात जिनीलिया सिंगल मदरची भूमिका साकारत आहे आणि तिचा मुलगा केवळ ३० दिवसांच्या चाचणी कालावधीसाठी नवीन वडिलांची मागणी करतो आहे.

आता मुलाचा आग्रह म्हणून जिनिलिया देखील त्याला प्रतिसाद म्हणून शक्य ते प्रयत्न करते. जिनिलिया मुलासाठी नवीन वडील म्हणून उज्जैनहून शिस्तबद्ध प्रजापती द्विवेदीला नोकरीवर ठेवते आणि घरी घेऊन येते. ज्याला ती प्रेमाने पीडी म्हणतात. हि नवीन वडीलांची भूमिका मानवने केली आहे. जो आई आणि मुलाच्या अपेक्षांच्या अगदीचं उलट प्रकरण आहे. आता या सिनेमात काय हंगाम होणार..? आणि यात प्रेम- मैत्रीची हि अनोखी कहाणी कशी फुलणार हे तर येत्या २१ जुलै २०२३ रोजी कळेल. तूर्तास ज्योती देशपांडे निर्मित, जिओ स्टुडिओज, क्रोम पिक्चर्स प्रोडक्शन, हेमंत भंडारी, अमित रविंदरनाथ शर्मा आणि आलिया सेन प्रस्तुत ‘ट्रायल पिरीयड’ सिनेमाचा ट्रेलर व्हायरल होतो आहे.