Prasad Oak |प्रसाद ओकने फॅमिलीसोबत केला बिसनेसक्लास विमानप्रवास, फोटो शेअर करत म्हणाला,…


Prasad Oak |मराठीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक सध्या जोरदार चर्चेत आहे. लवकरच प्रसादचा आगामी ‘धर्मवीर 2’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयासोबत प्रसादने दिग्दर्शनात देखील त्याचा हात आजमावला आहे. तसेच सध्या प्रसाद महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे त्याच्यासोबत या शोमध्ये सई ताम्हणकर देखील आहे.

अलीकडेच प्रसादने त्याच्या बायकोसोबत एक टूर केली आहे. खरं तर तो कामानिमित्त परदेशात गेला होता. परंतु कामासोबत त्याची बायकोसोबतही टूर झाली. आणि परदेशात जाऊन मुलालाही भेटता आले आणि याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा – 27 वर्षांचा याराना!! किरण मानेंनी शेअर केली दोस्तासाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘शेवटच्या श्वासापर्यन्त आसंल..’

प्रसादला मयंक आणि सार्थक ही दोन मुलं आहेत. सार्थक सध्या परदेशात राहतो. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी प्रसादने त्याची पत्नी आणि मुलगा मयंक सोबत परदेशात गेला होता. हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “फॅमिली टूर लवकरच भेटू सार्थक’विशेष म्हणजे प्रसादने बिझनेस क्लासमधून हा विमान प्रवास केलाय.

त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसतायेत. त्याच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी देखील कमेंट केले आहेत. सध्या प्रसाद त्याच्या आगामी ‘धर्मवीर 2’या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसेच त्याच्या ‘जिलेबी’ या चित्रपटाची चित्रीकरण देखील चालू आहे.