शिवानीने ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, ‘आपली पहिली भेट झाली तेव्हाच…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका सध्या तुफान चर्चेत आहे. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषिकेश शेलार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हि अक्षरा आणि अधिपती यांची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. तर मालिकेतील भुवनेश्वरी अर्थात अभिनेता कविता मेढेकर यांनी तर अभिनयाचा एक वेगळाच दर्जा दाखवला आहे. त्यामुळे भुवनेश्वरी या पात्रावर प्रेक्षकांचं विशेष प्रेम निर्माण झालं आहे. नुकतीच शिवानीने कविता मेढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. जी व्हायरल होत आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे ही अक्षराच्या भूमिकेत तर अभिनेत्री कविता मेढेकर भुवनेश्वरीच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळत आहेत भुवनेश्वरी अधिपतीची आई असल्यामुळे अर्थातच ती अक्षराच्या सासूबाई आहेत. त्यामुळे ऑनस्क्रीन सासूबाईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवानीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिवानीने कविता मेढेकर यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवानीने लिहिलंय, ‘Happy birthday कविता मेढेकर Tai! माझ्या लग्नात आपली पहिली भेट झाली तेव्हाच मी तुला सांगून टाकलं की मी तुझी फॅन आहे!! आणि आता तुझ्या बरोबर काम करून मला खूप आनंद होतो की तुझ्याकडून खूप काही शिकण्याची संधी मला मिळते आहे. तू पहिल्या दिवसापासून माझी मैत्रीण आहेस. आपले ‘गप्पांचे कट्टे’ माझे most favourite आहेत!! Many many happy returns of the day and here’s to many more projects with each other! Love you!’ भुवनेश्वरी आणि अक्षरा हि सासू- सुनेची जोडी मालिका विश्वात सध्या तुफान गाजते आहे. यंदाच्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात कविता यांना सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा असे दोन पुरस्कार तर शिवानीला सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला आहे.