माझी लक्ष्मी!! सिद्धार्थ- मितालीने खरेदी केली पहिली आलिशान गाडी; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. दोघांचा स्वतःचा वेगवेगळा आणि एकत्र असा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर हि जोडी कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसते. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. पण सध्या हि जोडी रोमँटिक फोटोंमुळे नव्हे तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच दिवाळीच्या मुहूर्तावर या जोडीने नवीकोरी आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली हे कायम एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. अशातच दिवाळीत सिद्धार्थने बायको मितालीसोबत मिळून पहिली आलिशान गाडी खरेदी केली आहे. सिद्धार्थ आणि मिताली दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे याच माध्यमातून दोघांनीही आपल्या चाहत्यांनी हि आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सिद्धार्थने नव्या गाडीसोबतचे फोटो आणि मितालीने नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. सिद्धार्थ हि पोस्ट शेअर करत लिहिले, ‘आमची पहिली गाडी… Proud Of You बायको!! तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!’

सिद्धार्थ आणि मितालीने गेल्यावर्षीच मुंबईत हक्काचं पहिलं घर खरेदी केलं आणि या वर्षात त्यांनी पहिली आलिशान गाडी खरेदी केली. मितालीने गाडीचा व्हिडीओ शेअर करत ‘माझी लक्ष्मी आली’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सिद्धार्थ आणि मितालीच्या पोस्टवर नेटकरी तसेच मित्रमंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. चांदेकर जोडप्याने Kia सेल्टोस ही गाडी खरेदी केली आहे. रिपोर्टनुसार, सध्या बाजारात या गाडीची किंमत जवळपास १०.८९ लाख ते १९.८० लाख (एक्सशोरुम) एवढी आहे.