‘हे शोभतंय..? रामायण आहे कि..’; ‘आदिपुरुष’मध्ये विभीषणाची पत्नी साकारणारी मराठी अभिनेत्री ट्रोल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पोस्टर, टीझर रिलीज झाल्यापासूनचं ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. मात्र तरीही VFX मूळे काही ना काही चांगलं पहायला मिळेल अशी आशा प्रेक्षकांना होती. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर जो भ्रमनिरास झालाय त्यावरून सिनेमाचं सुरु झालेलं ट्रोलिंग थांबेल असं वाटत नाही. आधी लूक, मग डायलॉग आणि आता एका सीनमुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आला आहे. आदिपुरुष’मधील विभीषणाच्या
पत्नीवरून आता नवा वाद उफाळला आहे. एका दृश्यामुळे सोशल मीडियावर तुफान ट्रोलिंग सुरु आहे. आदिपुरुष’मध्ये विभीषणाची पत्नी सरमाची भूमिका मराठी अभिनेत्री तृप्ती तोडरमलने साकारली आहे.

सिनेमात बिभिषणची पत्नी साडीचा पदर खांद्यावर घेत येतानाचे एक दृश्य दाखवले आहे. म्हणजेच तिला कपडे बदलताना दर्शवण्यात आले आहे. यावेळी बिभिषण तिला रामाचा महिमा सांगत असतात. ज्या पद्धतीने या सीनचे चित्रीकरण केले आहे ते पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या सीनचे व्हिडीओ तसेच फोटो व्हायरल होत असून यावरून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच भाजप नेते कपिल मिश्रा यांनी देखील या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. या आक्षेपार्ह दृश्यांवर कपिल मिश्रा यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे कि, ‘हनुमानजींना थिएटरमध्ये बसून हे दाखवा..?’

आदिपुरुषच्या या अश्लील दृश्यावर अनेक प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांनी तसेच विविध स्तरातील व्यक्तींनी आक्षेप घेतला आहे. सोशल मीडिया यूजर्स तर ‘आदिपुरुष’च्या संपूर्ण टीमवर टीका करत आहेत. अनेकांनी या सिनेमा ‘कलयुगी रामायण’ म्हटले आहे. तर काहींनी ‘हे रामायण आहे कि… आणखी काही..?’ असाही सवाल उपस्थित केला आहे. या सिनेमात बिभिषणाची पत्नी सरमाची भूमिका अभिनेत्री तृप्ती तोरडमलने साकारली आहे. तृप्ती एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिने ‘सविता दामोदर परांजपे’, ‘फत्तेशीकस्त’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय तिचे वडील मधुकर तोरडमल हे देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत.