‘.. सादगी से अच्छा कुछ और नहीं’; रिंकू राजगुरूच्या सौंदर्यावर भाळले नेटकरी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. यापैकी एक म्हणजे रिंकू राजगुरू. सैराट या चित्रपटातून लहान वयात तिने अभिनय विश्वात पदार्पण केले. रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. आताही तिने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून चाहते आपलं भान विसरून गेले आहेत. जणू काही रिंकूच्या सौंदर्याची त्यांच्यावर मोहिनी झाली आहे.

https://www.instagram.com/reel/CubTKPop_lq/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री रिंकू राजगुरूने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. ज्यामध्ये रिंकू साडीमध्ये दिसतेय आणि कमालीची सुंदर दिसते आहे. रिंकूने काळ्या आणि ग्रे रंगाची साडी परिधान केली आहे. सोबतच तिचा लूक अतिशय सौम्य आणि सालस आहे. रिंकू राजगुरूने या व्हिडिओसोबत एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे कि, ‘माना कि सादगी का दौर नहीं… मगर सादगी से अच्छा कुछ और नहीं’.

https://www.instagram.com/p/CtOClVptE06/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या या व्हिडीओ पोस्टवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘आप मेरे दिल के लाइब्रेरी की वो डायरी है, जिसे हम पढ़ना कम और देखना ज्यादा पसंद करते हे!’. आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘तेरी होठों की खामोशी भी आवाज हो जाती है, बालों को यूं ना बांधा करो, हवाएं नाराज हो जाती है।’ आणखी एका युजरने लिहिले आहे कि, ‘युनिक चेहरा आहे तुझा आणि साधेपणातही सुंदरता जपता येते हे तुझ्या प्रत्येक फोटो वरून समजत… गॉड ब्लेस यू!!’