‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अंजीने खरेदी केली आलिशान गाडी; फोटो शेअर करत म्हणाली…


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील कलाकार मंडळी आणि प्रेक्षकांची नाळ एकमेकांशी अशी जोडलेली असते कि मालिका संपून जातात पण कलाकार मात्र प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ हि मालिका संपली. पण या मालिकेतील पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. यांपैकी एका अभिनेत्रीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक कलाकार मंडळींनी नवं घर, नवी गाडी घेतल्याचे आपण पाहिले. यामध्ये अपूर्वा मोरे, मिताली मयेकर, सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रींचा समावेश आहे. यातच आता मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री कोमल कुंभारची देखील भर पडली आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभाराने नुकतीच दिवाळीचा शुभ मुहूर्त साधत नवीकोरी आलिशान गाडी घेतली आहे. ज्याचे फोटो तिने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री कोमल कुंभारने अत्यंत महागडी आणि आलिशान ह्युंदाईची गाडी घेतली आहे. तिने नव्या कोऱ्या गाडीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये ‘माझी गाडी…’ असे लिहिले आहे. या फोटोंमध्ये कोमलसोबत तिचा बॉयफ्रेंडदेखील दिसतो आहे. कोमलने शेअर केलेल्या या पोस्टवर तिचे मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि चाहते कमेंट करताना दिसत आहेत. प्रत्येकजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत कोमलने अंजली हे पात्र साकारले होते. जे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आणि आजही प्रेक्षक अंजीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.