Akshaya Naik Post | ‘हॅपी बर्थडे चिडू चिडू टू माय टूडी,’ लतिकाने खास अंदाजात अभ्याला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा


Akshaya Naik Post | कलर्स मराठीवरील सुंदर मनामध्ये भरली ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील सगळ्यात पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे ही मालिका काही दिवसांपूर्वी बंद झाली आहे. तरी यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात राज्य करतात. या मालिकेत लतिकाची भूमिका अभिनेत्री साकारली होती. आणि अभिमन्यू ही भूमिका अभिनेता समीर परांजपे यांनी साकारली होती. अशातच समीर परांजपे याचा वाढदिवस साजरा झाला. यानिमित्त अक्षया नाईकने त्याला खूप चांगल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अक्षय आणि समीर सोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिने दिली आहे की, “या भोळ्या चेहरा मागचा सैतान फक्त मला माहित आहे. याचा अभिमान बाळगू की माझं दुर्दैव समजून हेच मला कळलं नाही मित्र म्हणून तू मला जितका त्रास देतो त्याची भरपाई तू तुझ्या उत्तम अभिनयातून आणि आता गायकीतून करतोय. मित्र म्हणून तुला बघता क्षणी जितक्या शिव्या येतात. तोंडात तितकाच अभिमान वाटतो मला तुझी कला सादर करताना पाहून हिरो आहेस रे तू आपला.”

यापुढे तिने असे लिहिले आहे की, “माझे सगळे लाड पुरवण्यासाठी थँक्यू म्हणणार नाही. तुझी जास्तीची जबाबदारी आहे असं समज आणि तू जरूर कर तसेच करण जोहर तुझ्या बातम्यासह वाट पाहत आहे हॅपी बर्थडे चिडू चिडू टू माय टूडी.”

हेही वाचा – ‘… म्हणून शिंगणापूरच्या मंदिराला घुमट किंवा कळस नाही’; अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ पोस्टचे कॅप्शन चर्चेत

अक्षया नाईक हिची ही मालिका संपल्यानंतर तिने रंगभूमीवर प्रवेश केला चूक भूल द्यावी घ्यावी या नाटकातील काम करत आहे. त्याचप्रमाणे समीर हा सध्या सुर नवा ध्यास नवा या रियालिटी शोमधून स्पर्धक म्हणून सगळ्यांना पाहायला मिळत आहे.